Ad will apear here
Next
‘शहरी विकासासाठी टेरेस गार्डन्सना चालना देण्याची गरज’
‘पुणेकर वन मिनिट’ मोहिमेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद
अ‍ॅड. महेश गजेंद्रगडकरपुणे : शाश्‍वत शहरी विकासासाठी टेरेस गार्डन्सना चालना देण्याची गरज असल्याचे मत स्वर्ण भारत पक्षाचे पुणे लोकसभा उमेदवार अ‍ॅड. महेश गजेंद्रगडकर यांनी व्यक्त केले.

‘शहरात जेथे बागांसाठी जागा शिल्लक नाहीत, अशा ठिकाणी टेरेस गार्डनमुळे पर्यावरणीय व आर्थिक फायदा प्रत्येकाला होऊ शकतो. यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल. पावसाचे पाणी अडवायला मदत होईल (रेनवॉटर हार्वेस्टिंग) आणि एकंदर शहराच्या सौंदर्यात भर पडेल. यासाठी विविध निकष लावून टेरेस गार्डनिंग करणार्‍या लोकांना म्हणूनच शेतकर्‍यांचा दर्जा दिला पाहिजे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. 

मोहिमेबद्दल माहिती देताना अ‍ॅड. गजेंद्रगडकर

दरम्यान, महत्त्वाच्या विषयांवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यांच्याशी संवाद साधण्याच्या हेतूने अ‍ॅड. गजेंद्रगडकर यांनी ‘पुणेकर वन मिनिट’ ही डिजिटल मोहीम हाती घेतली असून, त्याला वाढता प्रतिसाद मिळत आहे.याअंतर्गत छोट्या एका मिनिटाच्या व्हिडिओच्या माध्यमातून गजेंद्रगडकर लोकांशी संवाद साधत आहेत.आतापर्यंत पेपरलेस इलेक्शन,फेरीवाले व विक्रेते, स्वतंत्रतावाद अशा अनेक विषयांवर संवाद साधला असून, यापुढे शिक्षण, उद्योग, आरोग्य, प्रशासकीय सेवा अशा महत्त्वाच्या विषयांवर संवाद साधणार आहेत.

याबाबत माहिती देताना अ‍ॅड. गजेंद्रगडकर म्हणाले, ‘पुण्यातील २० लाखांहून अधिक मतदारांपर्यंत कमीत कमी वेळात महत्त्वाचे विषय घेऊन पोहोचवण्याच्या हेतूने ही डिजिटल मोहीम आम्ही हाती घेतली आहे. खरंतर मला खात्री आहे, की पुणेकर या महत्त्वाच्या विषयांवरील व्हिडिओज फॉरवर्ड करून सर्वांपर्यंत पोहोचवतील. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.’

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZQABZ
Similar Posts
‘मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून मतदान प्रक्रिया पार पाडा’ पुणे : ‘भारत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून निवडणूक प्रक्रिया पार पाडावी,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्‍या.
‘निवडणूक कालावधीत बँकांनी आयोगाच्या सूचनांचे पालन करावे’ पुणे : ‘पुणे विभागातील सर्व बँकांनी निवडणूक कालावधीतील बँकिंग व्यवहार व उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण व देखरेख ठेवण्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
रजत अग्रवाल यांची मीडिया सेंटरला भेट पुणे : निवडणूक निरीक्षक रजत अग्रवाल यांनी गुरुवारी (१८ एप्रिल) मीडिया सेंटरला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.
तिवारी आणि गुलाठी यांची ‘एमसीएमसी’ला भेट पुणे : जिल्‍ह्यात लोकसभा निवडणुकांची माहिती प्रसारमाध्‍यमांना उपलब्‍ध व्‍हावी, यासाठी स्‍थापन केलेल्‍या मीडिया सेंटरला, तसेच जिल्‍हास्‍तरीय माध्‍यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीला (मीडिया सर्टिफिकेशन अॅंड मॉनिटरिंग कमिटी- एमसीएमसी) निवडणूक खर्च निरीक्षक सौरभ तिवारी आणि प्रियंका गुलाठी यांनी भेट देऊन पाहणी केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language